०४ नोव्हेंबर रोजी श्यामची आई कृतज्ञता सोहळा
पिंपरी: .यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे दुपारी ०४:०० वाजता श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तसेच टाटा मोटर्स उद्योगसमूहाचे मनोहर पारळकर आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात रहाटणी येथील भिकोबा तांबे मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश काळे यांना (श्याम) आणि त्यांच्या मातोश्री द्रौपदाबाई शंकरराव काळे यांना (श्यामची आई) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर (सानेगुरुजी विचारसाधना पुरस्कार), वि. दा. पिंगळे, सुनीता पवार, सायली संत (सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार) यांना तसेच चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल या शाळेला (सानेगुरुजी संस्कारक्षम शाळा पुरस्कार) सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

error: Content is protected !!