वडगाव मावळ
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याने तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगांव शहर अध्यक्ष  अतुल खंडुजी वायकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
वायकर यांनी राजीनामा देत असल्याचे पत्र मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांना पत्र दिले आहे.येत्या दोन दिवसांत वडगाव शहर सकल मराठा समाजाच्या उपस्थितीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आपणास उद्या फोन द्वारे कळविण्यात येईल. तरी मावळ तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!