
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व्याख्यान
पिंपरी:
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे राष्ट्रीय एकात्मता दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अंतर्गत सायंकाळी ६:०० वाजता भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सरदार पटेलांच्या जीवनचरित्राचे संशोधक पंकज पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
तसेच भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपा शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांची प्रमुख उपस्थिती राहील.
त्याचबरोबर यावेळी अमोल पाटील यांच्या संयोजनाखाली भोसरी येथे भोसरी – आळंदी रस्त्यावर मुक्ताई मंदिर ते चऱ्होली फाटा आणि परत मुक्ताई मंदिर या मार्गावर मोटरसायकल अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन




