टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील टाकवे बुद्रुक गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, तसेच उद्या पासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत भांडणारे आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील गावागावातील मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे., तर दुसरीकडे राज्यातील अनेक गावांमध्ये जोवर मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर कुठल्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात एन्ट्री करू द्यायची नाही, असा निर्णय स्थानिक मराठा बांधवांनी घेतल्याचे दिसत आहे.
मावळ तालुक्यातही टाकवे बुद्रुक गाव येथील सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकारींनी, ‘जोवर मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसा निर्णय होत नाही, तोवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये, जर कुणीही आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहिल,’ असे निवेदन वजा पत्र तहसीलदार महोदय यांना टाकवे गावातील मराठा बांधवांनी दिली आहे.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा