वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरात विविध विकासकामांना सुरुवात झाली असल्याची माहिती माजी  नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.आमदार सुनील  शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून व माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने ही कामे होत असलयाचे ढोरे यांनी सांगितले.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १३ येथील संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटी ते न्यू इंग्लिश स्कूल भोसले नगर येथील रस्त्यासाठी सुमारे २८ लक्ष रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक खंडु भिलारे, चंदुकाका ढोरे, श्रीराम ढोरे, सोसायटी अध्यक्ष निलेश वाघचौरे, उपाध्यक्ष माणिक भोसले, सचिव दिपक सुंबरे, सोमनाथ भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रत्यक्षात रस्ता क्रॉंक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आल्याने खूप वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष आभार व्यक्त केले. याशिवाय वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे प्रगतीपथावर असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी प्रभागामधील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ ढोरे, काशीनाथ ढोरे, विठ्ठल थोपटे, वनराज ढोरे, शिरीष ढोरे, संदिप ढोरे, सुनिल म्हाळसकर, रोहित ढोरे आणि स्थानिक रहिवाशी तसेच संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!