मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्याविमुक्त सेलच्या अध्यक्ष पदी नथुराम वाघमारे
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्याविमुक्त सेलच्या अध्यक्ष पदी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नथुराम शंकर वाघमारे यांची निवड करण्यात आली.पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्याविमुक्त सेलचे अध्यक्ष अण्णासाहेब शिवाजी धोत्रे यांनी त्यांची नियुक्ती केली.
   वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे ,मावळ तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे,संत तुकाराम सरकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते अँड. नामदेव दाभाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
            भटक्या विमुक्त सेलचे नवनिर्वाचित अध्यक्ष नथुराम वाघमारे हे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. यापूर्वी त्यांनी शिरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, साळूंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक म्हणून काम केले आहे.वाघमारे हे शिरगावच्या महादेव मंदीराचे विश्वस्त असून जय मल्हार क्रांती संघटनेचे सक्रीय पदाधिकारी आहे.
             भटक्याविमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष नथुराम वाघमारे म्हणाले,” मावळचे आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे,अँड. नामदेव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व भटक्याविमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांच्या सूचनेनुसार पक्ष संघटनेचे काम जोमाने करीन.
             राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहील.भटक्याविमुक्त समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे.हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
            नथुराम वाघमारे हे शेतकरी असून शेतकरीपूरक वस्तू पुरवठा करणारे व्यावसायिक आहे.त्यांच्या पाठीशी त्यांचे बंधू दत्तात्रय वाघमारे, पुतणे विनायक वाघमारे आणि पुत्र नवनाथ वाघमारे ठाम असलयाचे ते आवर्जून सांगताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मानसन्मान दिला.कृषी उत्पन्न बाजार समितीत संधी मिळाली.समाजाचे आणि पक्षाचे आपण देणे लागतो.या भावनेतून काम करीत राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माझ्या राजकीय जडणघडणीत अनेकांचा सिंहाचा वाटा असल्याची कबुली त्यांनी दिली.

error: Content is protected !!