विजयादशमीच्या मुहूर्तावर कामशेतला कांचन पार्वती नेत्रालयाचे उद्घाटन
कामशेत:
विजयादशमीच्या मुहूर्तावर कामशेत येथे कांचन पार्वती नेत्रालय सुरू होत आहे.महावीर हाॅस्पिटलने सर्वेसर्वा डाॅ.विकेश कांतिलाल मुथा आणि डाॅ.अशोक विठ्ठल दाते यांच्या पुढाकारातून ही रुग्णसेवा होणार आहे.सर्व सुविधायुक्त सुपरस्पेशालिटी असलेले ग्रामीण भागातील हे एकमेव रूग्णालय आहे.
डाॅ.विकेश कांतिलाल मुथा यांच्या मातोश्री कांचनबेन कांतिलाल मुथा आणि डाॅ.अशोक विठ्ठल दाते यांच्या मातोश्री कै.पार्वती विठ्ठल दाते यांच्या नावाने हे रूग्णालय सुरू होत असल्याची माहिती डाॅ.विकेश मुथा आणि डाॅ.अशोक दाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ.अशोक दाते M.S.,FICO,FPDS असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे नेत्रालय रुग्णसेवा पुरविणार आहे.दहा प्रशिक्षित तज्ज्ञांच्या समवेत डाॅ.अशोक दाते डोळ्यांवर उपचार करणार आहेत. या नेत्रालयात काॅम्पुटरद्वारे नेत्र तपासणी,बिनटाक्याचे (फेको),मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
अत्याधुनिक पद्धतीच्या लेन्स वापरुन शस्त्रक्रिया होतील. तिराळेपणा,लहान मुलांचे डोळयाचे आजार,पडदा (रटिना) चे आजार Yag laser  या ना अशा अनेक सुविधायुक्त असे हे नेत्रालय असणार आहे.
अद्ययावत ऑपरेशन थिएटर असणार आहे.मायक्रोस्कोप,फेको लेझर या परदेशी बनावटीच्या मशीनरी तपासणी साठी आहेत.प्रशस्त वेटींग रूम, चष्माघर,मेडिकल स्टोअर अशा सगळया सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे.सर्व कंपन्यांच्या इन्शुरन्स वर उपचार केले जातील.
नव्याने सुरू होत असलेल्या नेत्रालयाच्या ओपनिंगला बिनटाक्याच्या मोतीबिंदूच्या १०० शस्त्राक्रिया फक्त ७९९९ रुपयात केली जाणार आहे.
ज्याचा सर्वसाधारण पणे खर्च २५ ते ३० हजार येतो ते ऑपरेशन सवलतीच्या दरात केले जाणार आहे.आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील रूग्णांची आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.डाॅ.अशोक दाते यांचे तळेगाव स्टेशन परिसरात नेत्र रुग्णालय आहे.मागील ११वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून २० हजारांहून अधिक रूग्ण तपासणी त्यांनी केली असून शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांचे महावीर हाॅस्पिटल आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळात प्रसिद्ध आहे.अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने औषधोपचार करून त्यांचा जीव वाढविण्याचा हातखंडा मुथा यांना आहे.कोरोना त्यांनी केलेल्या कामाची भली मोठी आहे.
आपल्याला कामावर दृढ इच्छा असलेले डाॅ.विकेश मुथा व डाॅ.अशोक दाते यांना या नव्या युनिट मध्ये रुग्णसेवेचा वसा जपण्याचा विश्वास आहे.

error: Content is protected !!