खांड विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष देशमुख,उपाध्यक्ष पदी रामदास आलम
वडगाव मावळ :
खांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी सुभाष रामभाऊ देशमुख व उपाध्यक्ष पदी रामदास यशवंत आलम यांची बिनविरोध निवड झाली.मावळत्या अध्यक्षा सीमा प्रकाश  देशमुख व उपाध्यक्ष  सीताबाई ज्ञानेश्वर सावंत यांनी पदाचा राजनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सहायक निबंधक कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली.अध्यक्ष पदासाठी सुभाष देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी रामदास आलम यांचा उमेदवारी अर्ज आला होता.निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी देशमुख व आलम यांची बिनविरोध निवड घोषित केली.
ज्येष्ठ नेते अँड.नामदेव दाभाडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, ज्येष्ठ संचालक व सरपंच नामदेव शेलार  यांच्या प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी संचालक नामदेव शेलार, मारुती वाडेकर , भिमाजी पिंगळे, सिमा देशमुख, नामदेव जाधव ,आप्पा तुरडे ,बाळू ठिकडे ,किसन वनघरे  उपस्थित होते.सचिव मदन आडिवळे यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.
देशमुख व आलम यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अँड नामदेव दाभाडे व उपसभापती नामदेव शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष देशमुख व उपाध्यक्ष यांनी ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.सुभाष देशमुख हे खांड ग्रामपंचायतीचे सदस्य असून राजकारणात सक्रिय आहेत.
• वडिलांचे वारशाचे जतन
सुभाष देशमुख यांचे वडील रामभाऊ देशमुख हे आंदर मावळातील सक्रीय राजकारणी होते.त्यांच्या उमेदीच्या काळात गावचे सरपंच त्यांनी भूषविले याशिवाय ते प्रदीर्घ काळ खांड विविध कार्यकारणी सेवा सहकारी संस्थेचे संचालक होते.वडिलांच्या पाठोपाठ त्थांचा वारसा सुभाष देशमुख यांनी चालवला.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष देशमुख म्हणाले,” शेतकरी सभासदांनी कर्ज घेऊन शेतीपूरक व्यवसायाची वाढ करावी. तसेच नियमित कर्जाची परत फेड करून संस्थेचे हित जोपासावे.

error: Content is protected !!