तत्त्व एकच, -“आत्मतत्व
चैतन्यशक्ती”
या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस, जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली, *”चौथी माळ”* देवीला अर्पण करू या!
१) समता … २) सभ्यता … ३) सामंजस्य
*४) सहिष्णुता …* ५) समाधान …
६) लवचिकता … ७) नम्रता … ८) कृतज्ञता
९) “विश्वप्रार्थना”
चौथी माळ “सहिष्णुता”
मानवी संस्कृतीचा चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे “सहिष्णुता”. *”सहन करणे”* म्हणजे *”सहिष्णुता”!*
दुसऱ्याचे अपराध पोटात घालता आले पाहिजेत.* माणसे आप आपसात घरी भांडतात, समाजात, राष्ट्रात, विश्वात भांडतात.
सहिष्णुता म्हणजे “सहनशक्ती”, ज्याच्याजवळ सहनशक्ती नसते तो फटकन काहीतरी बोलतो, कसेतरी वागतो, काहीतरी करतो व त्यामुळे जीवनात अपयशी होतो.
एक उदाहरण देतो, लहानपणी आम्ही समुद्रात पोहायला जात असू. पोहताना मोठी लाट आली की समुद्राच्या पोटात शिरायचे व लाट डोक्यावरून जायची. जे मूर्ख असतात ते लाटेला सामोरे जातात. त्यांच्या छातीवर लाट फुटते व ते दूर फेकले जातात.
त्याचप्रमाणे ….
“एक घाव दोन तुकडे”* करण्यातच मोठेपणा सामावलेला आहे, असा बऱ्याच मूर्ख लोकांचा समज असतो. *अशी मूर्ख माणसे जीवनात सर्वच क्षेत्रात मार खातात.*
थोडक्यात, ….
“सहिष्णू” असतात ते नम्र होतात, हात जोडतात व यशस्वी होतात.* जे सहिष्णू नसतात त्यांना जीवनात अनेक आपत्ती-विपत्तीना तोंड द्यावे लागते.
नम्र झाला भूता। तेणे कोंडिले भगवंता।।*
(क्रमशः)
*— सद्गुरू श्री वामनराव पै*
(संदर्भ : परमेश्वर आहे का ?
असेल तर तो दिसत का नाही)
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा