
वडगाव मावळ :
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन राज्यातील ग्रामपंचायतीकडून आकारण्यात आलेल्या अवास्तव “करपट्टी “विरुध्द तसेच वीजबीलाविरुद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर आणी सचिव विलास साळवी यांचे मागॅदशॅनाखाली कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले शरद गोडांबे सुभाष केदारी राज्य संघटक सोनबा गोपाळेगुरूजी मावळ तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे उद्योजक सचिव आवटे महेश कुडले आदी पदाधिकार्यानी वडगाव मावळ व पुणे येथील तज्ञ कायदे सल्लागार यांचेशी सल्ला मसलत करुन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात शेती ला जोडधंदा म्हणुन म्हणून दहा लाख शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायातुन अनेक सुशिक्षित तरूणांना रोजगार उपलब्ध तर झालेले आहेच शिवाय अनेकांनाही रोजगार उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय या उद्योजकांकडुन नापिक व पडिक जमिनी वापरात आणल्या आहेत.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन




