वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आयुष्यमान भारत योजना अंतर्गत वडगाव शहरातील पाच हजार नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड काढून देण्यात येणार तसेच लेक लाडकी योजनेंतर्गत शहरातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या शासकीय योजनांचा मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.
१ एप्रिल २०२३ नंतर पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून १ लाख एक हजार रुपये इतका लाभ टप्प्याटप्प्याने मिळून देण्यात येईल. शासकीय जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर लेक लाडकी या योजनेची सविस्तर (अटी, शर्ती) माहिती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी
नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित