
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या अध्यक्ष पदी ज्योती भरत राजिवडे यांची निवड करण्यात आली.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे अध्यक्ष सुभाष शेडगे यांनी त्यांची नियुक्ती केली
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांच्या हस्ते राजिवडे यांना निवड पत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्ती नंतर राजिवडे म्हणाल्या,”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके ,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,तालुकाध्य्क्ष गणेश खांडगे यांना अभिप्रेत असणारी संघटना वाढीसाठी काम करीन.
पक्ष बळकटी साठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मावळ तालुक्याचे दिव्यंग सेलचे अध्यक्ष सुभाष शेडगे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन तळेगाव दाभाडे दिव्यंग सेल महिला शहराध्यक्ष पदी माझी निवड केली,या विश्वासास पात्र ठरेल.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




