कामशेत :
येथे नविन मतदार नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय,
   भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने नवीन मतदार अभियान व दुरुस्ती कार्यक्रम  सोमवार दिनांक ९/१०/२०२३ ते १०/१०/२०२३ पर्यंत सकाळी ९ ते सायं ५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथे घेण्यात आला.
    या अभियानाचे उद्धाटन मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या अभियानास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला या नोंदनी अभियानामधे ६७९ नविन मतदार यांनी नोंदणी केली.
      याप्रसंगी ज्येष्ठ नेते माऊली शिंदे,माजी सभापती राजाराम शिंदे, भाजपाचे नेते शंकर  शिंदे,प्रदेश सदस्य ओबीसी आघाडी संतोष कुंभार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड ,जिल्हाउपाध्यक्ष रामदास गाडे,सखाराम कडू, विद्यार्थी आघाडी मा. अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,कामशेत शहर अध्यक्ष विजय शिंदे, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण  शिंदे,कामशेत महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा बच्चे,उपाध्यक्ष संजय बिनगुडे , राजाराम असवले,माजी उपसरपंच बाळासाहेब गायखे ,नितिन गायखे,माजी सरपंच सारिका शिंदे,ओबीसी आघाडी अध्यक्षा मयुरी ठोसर,शरद नखाते,रतन जैन,निवृत्ती शिंदे,विठ्ठल तुर्डे, मानस गुरव यांसह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!