सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात
सायबर गुन्हे जागृतीसाठी विशेष सत्राचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, वराळे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या वतीने सायबर गुन्हे आणि त्याबद्दलची जाणीव जागृती यानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात एका विशेष सत्राचे आयोजन केले होते.
यावेळी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीहरी मिसाळ म्हणाले, “जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने जी माहिती मिळवणे गरजेचे आहे तीच माहिती या सत्रामधून विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवली जात आहे. ज्ञान हेच आपल्या सुरक्षिततेसाठी शस्त्र म्हणून वापरता येऊ शकते. सायबर गुन्हे या विषयातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या सत्रामधून सायबर गुन्हे कसे घडतात? ते कसे ओळखायचे? एखाद्या व्यक्तीबाबत चुकीचे काही झाल्यानंतर नेमके काय करायचे? याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या कोणत्याही साइटवर गेल्यानंतर आपली कोणती माहिती भरायची? कोणती काळजी घ्यायची? याविषयी विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
सागर खुळे, आदित्य चौबे, वेदांत ससे, दिव्या रानडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी समन्वयक मृणाल मापुस्कर उपस्थित होत्या. प्राध्यापक सोमनाथ कसबे यांनी सूत्रसंचालन केले. या उपयुक्त अशा सत्राचा दोनशे विद्यार्थिनींनी लाभ घेतला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.