तळेगाव स्टेशन:
डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड इनोव्हेशनच्या विद्यार्थ्यांनी तळेगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम राबवली.कॉलेज N.S.S आणि ग्रीन क्लबच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी ३ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवली.
विविध विभागातील रेल्वे कर्मचारी, जीआरपी, आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले होते.स्टेशन व्यवस्थापक अनिल नायर, स्टेशन मास्तर सुनील गुप्ता ,अनिल गायकवाड यांच्यासह तळेगाव रेल्वे स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
स्वच्छता उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्टेशन मॅनेजरने N.S.S आणि कॉलेजच्या ग्रीन क्लब युनिटने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.