टाकवे बुद्रुक:
ग्रामपंचायत भोयरे तालुका मावळ येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा  उपक्रम राबविण्यात आला. एक तारीख एक तास श्रमदानासाठी या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता ही सेवा शपथ घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये स्वच्छतेचे कार्यक्रम राबविण्यात आले.
सरपंच वर्षा अमोल भोईरकर ,ऋषीकेश खूरसुले ,नीता भोईरकर ,दिपाली जांभुळकर, रंजना भोईरकर ,संगीता वाघमारे, रामदास भोईरकर, बाळू भोईरकर ,ग्रामसेविका प्रमिला सुळके, ग्रामपंचायत कर्मचारी माऊली खरसुले ,शंकर भोईरकर, तसेच ग्रामपंचायत भोयरे येथील सर्व उपस्थित ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मंदाताई अडिवळे ,रूपाली भोईरकर ,अंगणवाडी मदतनीस आशा डोळस ,आशा वर्कर अशा खडके उपस्थित होते.

error: Content is protected !!