ध्येय ठरवून मेहनत केल्यास यश निश्चित :भाऊसाहेब आगळमे
मावळ तालुक्यातील पोलिस दलातील सेवेत दाखल झाल्यांचा सत्कार
करण्यात आले
वडगाव मावळ:
पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे, असे प्रतिपादन यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भाऊसाहेब आगळमे यांनी केले.तसेच ध्येय ठरवून मेहनत केल्यास यश निश्चित असा अनुभव त्यांनी कथन केला.
यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित साते यांची २८ वी वार्षिक सभा संस्था कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी स्पर्धा परिक्षेत मावळ तालुक्यातील पोलिस दलात विविध पदांवर विराजमान झालेले सुपुत्रांचा सत्कार करण्यात आला
यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर संधी मिळालेली अश्विनी गाडे व श्रुती मालपोटे तसेच पोलिस हवालदार सानिका काजळे, संतोष लोंढे, नागेश मोहिते, अभिषेक काजळे, ओंकार भुंडे, स्वप्निल पवार,विक्रम जांभूळकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ तुकारम असवले उपस्थित होते.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष नारायण ठाकर, बंडोबा मालपोटे,साते ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर आगळमे,टाकवेचे उपसरपंच ॠषीनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदिप शिंदे उपस्थित होते.
आगळमे म्हणाले,” राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, असे असताना शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे धोरण पतसंस्थांनी स्विकराले होते. नोटबंदीच्या काळात पतसंस्थेचे आधार देण्याचे काम केले. ठेवीच्या सुरक्षेला महत्व देणे गरजेचे असल्याचे नमुद केले. असवले म्हणाले ,”तालुक्यातील ग्रामीण भागातील चांगले काम करणारी पतसंस्था असून व सर्वांनी एकत्र येऊन पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. नारायण ठाकर म्हणाले ,मावळ तालुक्यातील सहकार चळवळीला बळ देत एका उंचीवर नेले आहे. चांगले काम करणाऱ्या संस्था चालकांचे कौतुक करणे आपले कर्तव्य ठरते. त्यातुन चालकांना उभारी मिळून आणखी प्रगती होण्यास हातभार लागतो.
मावळ तालुक्यातील गावात पैशांची व विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी संस्थेचे नामदेव गाभणे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
भारत काळे यांनी सुत्रसंचालन तर संचालक पतसंस्थेचे सी.ई.ओ दत्तात्रय मोहिते यांनी स्वागत केले तर संभाजी बोऱ्हाडे यांनी आभार मानले.