
वडगाव मावळ:
मोरया प्रतिष्ठान व वडगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव शहरात “स्वच्छता ही सेवा” या अभियानाअंतर्गत “एक तास एक साथ” हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक सामाजिक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या.
स्वच्छता श्रमदान या अभिनव उपक्रमांतर्गत शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, संत निरंकारी मिशन मंडळ, जैन विहार ग्रुप, मोरया ढोल पथक, डॉक्टर्स असोसिएशन, रमेश कुमार सहानी स्कूल, आशादिप काॅम्प्युटर्स, मोरया हाऊसकिपींग या सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी शहरातील पोटोबा महाराज मंदिर परिसर, भाजी मंडई, दत्तनगरी परिसर, रेल्वे स्टेशन, पुणे-मुंबई हायवे परिसर आदी ठिकाणी श्रमदान करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा. सभापती गुलाब म्हाळसकर, माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण, पुनम जाधव, दिलीप म्हाळसकर, दिनेश ढोरे, पंढरीनाथ ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, किरण म्हाळसकर, संपत म्हाळसकर, अनंत कुडे आणि नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी व सर्व संस्थांचे स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.
“एक तास एक साथ” या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शहरातील सुमारे सात टन कचरा गोळा करून श्रमदान पूर्ण करण्यात आले. तसेच वडगाव नगरपंचायत वतीने सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
यावेळी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी समस्त वडगावकरांना आवाहन केले की, वडगाव नगरपंचायत चे आरोग्य कर्मचारी आपल्या शहरासाठी स्वच्छतेचे काम दररोज सातत्यपूर्ण करत असतात. त्यांचे आरोग्य व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकून स्वच्छतेची सेवा आपल्या शहरासाठी देत असतात. अतिशय धोकादायक दुर्गंधी व विचित्र परिस्थितीमध्ये आपले आरोग्य कर्मचारी काम करत असतात त्यांचं काम खरच जोखमीचे असते.
त्यांच्या विषयी सहानुभूती म्हणून २ ऑक्टोंबर ला महात्मा गांधी जयंती निमित्त आपण सर्वजण आपल्या घरापाशी कचरा घेण्यासाठी तसेच रस्ता व गटारी साफ करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एक फुल किंवा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार सन्मान करावा अशा प्रकारे एकमेकांमध्ये आपुलकी व प्रेमाची भावना निर्माण होईल. हीच खरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली होईल.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




