वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी गणेश खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.पक्षाचे तालुकाध्यक्ष खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)गटाची तालुका कार्यकारणी कायम ठेवली आहे.शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखीत केलेल्या कार्यकारणीत   ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष पदी संदीप आंद्रे,कार्याध्यक्ष पदी साहेबराव कारके यांची फेरनियुक्ती केली आहे.
जिल्हा नियुक्त ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष पदी राजू देवकर व कार्याध्यक्ष पदी सुनिल दाभाडे यांचाही या कार्यकारणीत समावेश आहे.  खांडगे यांच्या कार्यकारणीत कार्याध्यक्ष,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष,संघटक,वरिष्ठ उपाध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस,प्रवक्ते,चिटणीस,संघटक सचिव,संघटनमंत्री,लोणावळा तळेगाव देहूरोड प्रभारी, आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळ पूर्व व पश्चिम अध्यक्ष,लोणावळा,देहूरोड,वडगाव मावळ,कामशेत,इंदोरी शहरांच्या अध्यक्षांना कायम ठेवण्यात आले आहे.
सुकाणू समितीत तालुक्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांचा समावेश असून २२ जणांची सुकाणू समिती पक्ष संघटनात्मक कामे व निवडणूक व्यूहरचना यावर मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय सहकार,ज्येष्ठ नागरिक,ओबीसी,भटक्या विमुक्त,आदिवासी,डाॅक्टर,लिगल,अल्पसंख्याक,किसान,औद्योगिक व व्यापार,क्रिडा,सामाजिक न्याय,सेवादल,संरपच परिषद,कामगार,चित्रपट साहित्य व सांस्कृतिक सेल च्या अध्यक्षांना कायम ठेवण्यात आले आहे.सुमारे दीडशे कार्यकर्त्याचा या कार्यकारिणीत समावेश आहे.
मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची संधी दिल्यानंतर तालुक्यातील पक्षसंघटनेने वेगवेगळे उपक्रम राबविले याकडे खांडगे यांनी लक्ष  वेधले.खांडगे म्हणाले,”घर तिथे झेंडा आणि गाव तिथे राष्ट्रवादी,एक तास राष्ट्रवादी साठी,पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशिक्षण शिबीर,वर्धापनदिनानिमित्त ‘साहेब आधारवड असे उपक्रम राबविण्यात आले. तालुक्यातील विविध प्रश्नांवर जनआंदोलन घेतली आहे. तर मागील पंधरवडय़ात गावभेट दौरा काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकासाची भूमिका आणि गावपातळीवरील प्रश्नांवर जनतेच्या सूचना घेतल्या आहे. या बाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार व  आमदार सुनिल शेळके यांना दिला आहे.
मागील वर्षभरात झालेल्या गावपातळीवरील ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पक्षाने मोठे यश मिळवले आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना सामाजिक उपक्रम  राबविणार आहे.
आमदार सुनिल शेळके व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा विश्वास खांडगे यांनी व्यक्त केला. तळेगाव दाभाडे व देहू शहर येथील अध्यक्ष पदांच्या बाबतीत स्थानिक पातळीवरील नेते मंडळीशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही खांडगे यांनी सांगितले.

error: Content is protected !!