टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील भोयरे येथे आठवडे बाजार सुरु करण्यात यावा,अशी मागणी भोयरे ग्रामपंचायतींने केली आहे. सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
भोईरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आंदर मावळातील भोयरे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून गावची लोकसंख्या २२३० आहे. भोयरे गावालगत MIDC चे कामकाज चालू आहे. त्यामुळे याठिकाणी खूप वर्दळ पहावयास मिळते. भोयरे गावच्यालगत २-२१ किलोमीटर पर्यंत निगडे, पवळेवाडी, कोंडीवडे आ. मा. कशाळ, किवळे, इंगळून, पाठेवाडी, कुणे. अनसुटे, तळपेवाडी, पिंपरी, माळेगाव, सावळा इत्यादी गावे येत आहे.
भोयरे या ठिकाणी वार शनिवार या दिवशी आठवडा बाजार चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर ठिकाणी आठवडा बाजार चालू झाल्यास इतर गावांना अत्यंत जवळ व सोयीचे होईल. तरी महोदय मौजे भोयरे फाटा या ठिकाणी आठवडा बाजार सुरु करण्यात यावा.
या निवेदनावर सरपंच वर्षा अमोल भोईरकर, उपसरपंच ऋषीकेश तानाजी खुरसुले,.बाळू तानाजी भोईरकर, दिपाली राजू जांभूळकर, संगिता अनिल वाघमारे , निता तानाजी भोईरकर , रामदास पारु भोईरकर, रंजना पोपट भोईरकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.