राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तळेगाव पोलिसांचा सन्मान
तळेगाव दाभाडे:
गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेसह गणेश भक्तांची काळजी घेणा-या पोलीस बांधवाचा  मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस बांधव व अधिका-यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.

यंदाचा गणेशोत्सव उत्साहात पार पडला.तळेगाव दाभाडे शहर व पंचक्रोशीत सात दिवसांची धूम होती. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव थाटामाटात संपन्न झाला.गणेशोत्सव साजरा होत असताना पोलिसांना आवाहन असतेच,शिवाय घरापासून दूर राहत,पोलीस प्रशासन एक प्रकारे गणरायाची भक्ती आणि सेवा रूजवत असतातच.

दिवस रात्र एक करून, परिवारापासून लांब राहून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यात ते व्यस्त असतात.तळेगाव दाभाडे शहरात झालेले सातव्या दिवशीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्सहात झाली. यंदाचा गणेशोत्सव आनंदात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विकी लोखंडे म्हणाले,”आपले कर्तव्य दक्ष सर्व पोलीस बांधव अठरा अठरा दिवस उभे राहून कायदा सुव्यवस्था राखीत आहे. ऊन,वारा,पाऊस कशाचीही पर्वा न करता ते समाजासाठी राबत आहे,त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा थोडासा प्रयत्न केला.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या तळेगाव दाभाडे येथील पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त करून सन्मान केला. आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष  गणेशजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पुणे जिल्हाध्यक्ष विकी लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक सत्यवान माने  व इतर सहकार्याचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गणेश थिटे ,सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष सागर भालेराव, महिला कार्याध्यक्ष मनिषा रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते महेश रघुवंशी, उपाध्यक्ष प्रणय ओव्हाळ, अजय कढरे, वडगांव अध्यक्ष गणेश पाटोळे, व अन्य  पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!