इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणेशोत्सवाची धूम
इंदोरी:
येथील सीबीएसई बोर्डाच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणेशोत्सवाची धूम आहे. चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित,चैतन्य इंटरनेशनल स्कूल (सीबीएसई) येथे विघ्नहर्ता श्री गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले..श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली.
गणेशोत्सव कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी इंदोरी ग्रामपंचायत आणि धर्मनाथ मित्र मंडळाचे सदस्य प्रातःकालीन आरतीला उपस्थित होते.
सरपंच शशिकांत शिंदे ,उपसरपंच धनश्री काशिद,बाळू पानसरे,स्वप्निल शेवकर ,संदीप नाटक ,राजश्री राउत, जयश्री सावंत आणि इतर सदस्य उपस्थित होते.
धर्मनाथ मित्रमंडळाचे संदीप ढोरे, महेश राउत, प्रथमेश वीर आणि इतर सदस्य उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांनी आभार मानले.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा