शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीचे वाटप 
कामशेत:-सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब कामशेत व जैन इंग्लिश  यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबिर चा मूर्ती वाटप  गणेश मंगल कार्यालय कामशेत  येथे झाले.
आपला बाप्पा आपणच बनवूया
पर्यावरण वाचवूया अर्थात इको फ्रेंडली गणेशउत्सव या संकल्पनेनुसारआपला बाप्पा आपण बनून आपल्या घरी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने कामशेत येथे मागील 6 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.व पर्यावरण जनजागृती विषयी संदेश देण्यात येत आहे यंदाचे हे सातवे वर्ष आहे असे मत आपल्या मनोगता मध्ये सह्याद्री विध्यार्थी अकादमी महाराष्ट्र संपर्क प्रमुख  चेतन वाघमारे यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन व गणेश मूर्ती पूजन करून उदघाटन करण्यात आले.
जवळजवळ 150 विध्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला होता यामधील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पेन वाटप करण्यात आला प्रथम तीन क्रमांकाला मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले
उदघाटन सोहळ्या प्रसंगी मान्यवरांमध्ये प्रामुख्याने सुनील वॅक्स म्युजीअम सुनील कडलरू मोहन वाघमारे,  विजय तिकोने, नितीन फाकटकर,विनय दाभाडे ,योगेश गायकवाड,सुनील भटेवर, महेश शेट्टी, शिवा पिल्लई,  सिनेकलाकार प्रमोद साखरे मान्यवर होते.
तसेच सह्याद्री विध्यार्थी अकादमीच्या वतीने सचिन शेडगे,किरण ढोरे,अनिश शर्मा, निखिलेश दोंडे , तेजस वाघवले, साहिल शिंदे, अमोल तिकोने, सत्यम तिकोने, किशोर लष्कर, ,वैभव हजारें, संतोष कदम,बाळासाहेब जमादार, अभिजीत गरुड, किशोर वाघमारे, राहुल राजीवडे, तेजस शिंदे,आदीचे सहाकार्य लाभले.
तसेच प्रशिक्षनार्थी म्हणून अतिष थोरात सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक केदार डाखवे यांनी केले तर आभारप्रदर्शन सहदेव केदारी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक लक्ष्मण शेलार यांनी केले.

error: Content is protected !!