कामशेत:
तो पोटा पाण्यासाठी हाताला काम मिळावे म्हणून नांदेडहून मावळात आला. हाताला मिळेल ते काम करीत त्याची जगण्याची धडपड सुरूच होती.अशाच काम करीत रात्री तो माघारी येत असताना खंडाळयात त्याचा अपघात झाला.खिशात रुपया नाही तर उपचार कसे करायचे या विवेचनातील तरुणाच्या मदतीला कामशेतचे महावीर हाॅस्पिटल धावून आले,डाॅक्टरांनी मोफत उपचार केले.
तर मेडिसिन साठी महावीर हाॅस्पिटल मधील स्टाफने या तरूणाला तीन दिवसाचा पगार दिला. सामाजिक जाणिवेतून महावीर हाॅस्पिटल आणि त्यांच्या स्टाफने केलेला हा मदतीचा हात कौतुकास्पद आहे.
दिगंबर गायकवाड असे मदत केलेल्या तरूणाचे नाव आहे.त्याच्या वर महावीर हाॅस्पिटल येथे योग्य ट्रीटमेंट करून नुकताच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज करताना महावीर हाॅस्पिटलच्या स्टाफने त्याचे औक्षण केले,त्याचा सन्मान करीत त्याला घरी पाठवले.
या विषयी अधिक माहिती देताना डॉ.विकेश मुथा म्हणाले,” दिगंबर गायकवाड याचा अपघात झाल्यावर रस्तावर तसाच पडून होता. त्याला ईएमएस मावळच्या स्टाफने त्याला महावीर हाॅस्पिटल येथे दाखल केले. त्याला गंभीर दु:खापत झाली होती. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याच्या नातेवाइकांचा शोधणे कठीण होते.
तीन दिवसांनी नातेवाईक आले,तो पर्यत गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य उपचार सुरू होतेच,पण त्याच्यावर उपचारासाठी आर्थिक अडचण होती,त्या कडे कानाडोळा करून महावीर हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिगंबर वर उपचार केले. तर त्याला औषधोपचार करण्यासाठी स्टाफने तीन दिवसांचा पगार दिला.