तळेगाव दाभाडे:
आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढीसाठी मेहनतीने व चिकाटीने करा असे आव्हान बँक ऑफ महाराष्ट्र च्या इंदुरी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक सुमित वाडेकर यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्था च्या वतीने आयोजित केलेल्या सीसीटीव्ही दुरुस्ती व देखभाल तसेच दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती कार्यक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
हे प्रशिक्षण भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय च्या अंतर्गत श्रीक्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथेश्वर एज्युकेशन ट्रस्ट व कॅनरा बँक यांच्या प्रयोजनाने विनामूल्य रहिवास प्रशिक्षण व भोजन या स्वरूपात अनुक्रमे तेरा दिवस व दहा दिवस चे आयोजन संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर यांनी केले.
समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी केले.
याप्रसंगी महेश सुपेकर , धनंजय टीळे व चेतन शिंदे यांनी या दिवसात आलेल्या अनुभव कथन करून निश्चितच एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना सुमित वाडेकर यांनी म्हणाले की ,”आपला व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी मेहनत कष्ट आणि प्रशिक्षणाची गरज असते. आपल्याला ते मिळाले असून त्याचा वापर यशस्वी होण्यासाठी करावा व स्वतःबरोबर इतरांच्या ही प्रगतीमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल भारत सरकारच्या स्किल डेव्हलप अंतर्गत व एन सी व्ही टी(NCVTI) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र बावचे, योगिता गरुड, रवी घोजगे व बाळू अवघडे यांनी विशेष प्रयत्न घेतले.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा