लोणावळा:
मळवलीच्या बालग्राम संस्थेच्या पुढाकारातून औंढे येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. गावातील ऐंशीहून अधिक जणांनी या शिबीरात नेत्र तपासणी करून घेतली. गरजूंना औषधोपचार करण्यात आला.
वडगाव मावळ येथील महिला बालकल्याण विभागाचे प्रकल्पधिकारी विशाल कोतागडे ,पंचायत समिती मावळ  कक्षा अधिकारी भोईर सर यांनी शिबिराला भेट दिली.
ग्रामपंचायतचे सर्व लोकप्रतिनिधी सरपंच अरुण चव्हाण, ग्रामसेवक जोशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सुरेखा किरण केदारी सदस्य उपस्थित होते.अंगणवाडी सेविका कविता मांडेकर आणि सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!