
पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर,स्वामी प्रोअॕक्टीव्ह अॕबॕकस वाल्हेकरवाडी,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमानेगुरुव्दारा परिसरातुन शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविले.
परिसरातील नागरिकांना पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन विद्यार्थांनी केले.यामध्ये सजावटीसाठी प्लॕस्टीकचा वापर टाळा,थर्माकोलचा वापर टाळा,प्लॕस्टर आॕफ पॕरिसच्या मुर्ती घेऊ नका,शक्यतो शाडू मातीच्याच मुर्ती बसवाव्यात,गणेशमुर्ती लहान आकाराची घ्यावी.गणपती विसर्जन घरच्याघरी करावे कापडी पिशवीचा वापर करा असे आव्हान करण्यात आले.
पर्यावरणाचे महत्त्व संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांनी सांगितले.अभियानाचे संयोजन डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भानुप्रिया पाटील,विकास पाटील, शब्बीर मुजावर,आनंद पाथरे,मनोहर कड,भरत शिंदे,ओम पाथरे,पल्लवी नायक,स्वामी पाटील यांनी केले होते.परिसरातुन विद्यार्थांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




