पीएमपीएलची मिंडेवाडी निगडी बस सेवा सुरू
बसची पूजा वाहक चालकांचा सत्कार
वडगाव मावळ:
पीएमपीएलची मिंडेवाडी ते निगडी बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मिंडेवाडी,बधलवाडी,नवलाखउंब्रे,नाणोली तर्फे चाकण,आंबी,कातवी या गावातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी,महिला,ज्येष्ठ नागरिक यांना या संधीचा लाभ होईल.
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे गावक-यांनी सांगितले. सरंपच अलका बधाले व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बळीराम मराठे यांच्या हस्ते मिंडेवाडीत बसचे पूजन करण्यात आले.
यावेळी उद्योजक बाळासाहेब बधाले ,रामदास लालगुडे,अंकुश बधाले ,शंकर बधाले ,सुनिल बधाले ,राहुल जाधव ,राजु बधाले ,सोमनाथ बधाले ,बाळासाहेब जाधव ,निलेश बधाले ,संदिप पापळ ,राजु सातपुते ,भानुदास बधाले ,तन्मय मराठे ,दत्तात्रय बधाले हे उपस्थित होते.
सरपंच बधाले व राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बळीराम मराठे यांच्या हस्ते बसच्या चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. बळीराम मराठे म्हणाले,” मिंडेवाडी,बधलवाडी,नवलाखउंब्रेतून अनेक विद्यार्थी तळेगाव दाभाडे,निगडी,पिंपरी,चिंचवड शहरात शिक्षणासाठी जात आहे.पीएमपीएलची बससेवा सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून हा प्रश्न मार्गी लागला आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील नवलाखउंब्रे,मिंडेवाडी,जाधववाडी,बधलवाडी,आंबी परिसरातील नागरीकरणीकरण दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या नागरीकरणाने येथील सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची मागणी वाढली आहे. सध्या नवलाखउंब्रे,मिंडेवाडी या बससेवा सुरू असलेल्या आहे.
आगामी काळात मंगरूळ,आंबळे,निगडे परिसरात देखील कारखानदारी होणार आहे,या सर्व पार्श्वभूमीवर पीएमपीएलच्या बससेवेचे जाळे भविष्यात अधिक विस्तारेल असा आशावाद मावळ राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बळीराम मराठे यांनी व्यक्त केला.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा