
वडगाव मावळ:
कान्हे ता.मावळ जि.पुणे येथे अथर्व विजय सोशल फाऊंडेशनच्या वतीने भरड धान्य प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
भरड धान्य विविध पदार्थ पाककला प्रदर्शन व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला . या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मा. निवेदिता शेटे (संशोधक तज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव) यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
महिला उद्योग चालना देण्यासाठी आरती घुले (अध्यक्ष महिला संघ महाराष्ट्र राज्य)यांचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मायाताई येवले(सचिव अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन)यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत संजना सातकर ,इंदूताई सातकर भारती सातकर यांनी केले.आभार प्रदर्शन वंदना कदम यांनी केले.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




