
वडगाव मावळ:
कचरेवाडी येथील अमित विष्णु जाचक (वय ३१)या तरूणाचा तळेगाव चाकण रस्त्याला इंदोरी जवळ अपघात झाला.या अपघातात तरूणाला जीव गमवावा लागला.
या महामार्गावरील अपघाताची मालिका संपता संपत नाही,कित्येक जणांचे बळी या रस्त्यावर गेले आहे.मावळ तालुक्यातील तरूणांमध्ये अमित लोकप्रिय होता. तरूण मित्रांमध्ये त्याची मोठी क्रेझ होती. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटनेचे अमित आवडीने कामे करायचा.
अमितच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहिण,पत्नी असा परिवार आहे.त्याच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तर कुटूंबिय आणि नातेवाईक यांच्या आक्रोशाला सीमा नाही.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार




