तीन देशी बैलांना कत्तीलीपासून जीवदान : पवन मावळ येथे गोरक्षकांची मोठी कारवाई
पवनमावळ :
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन कापण्यासाठी अनेक जनावरे नेण्यात येत आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील गोरक्षकांनकडून अनेक कारवाई चालू आहे. त्याच  पार्श्वभूमीवर शनिवार ( दि.१९)  रोजी, कत्तली साठी चालविलेल्या तीन देशी बैलांना गोरक्षकांकडून जीवदान मिळाले आहे.

पवनानगर कामशेत रस्त्यावर (दि.१९)  रोजी, लोणावळा कुंभेरी येथून एमएच १४ डीएम ९११४, एमएच १४ डीएम ९१०५, एमएच १४ डीएम ६००० अशी तीन खोट्या नंबर प्लेट लाऊन पोलिसांची दिशाभूल करून पिकअप गाडीमधे कासायांचा एजंट सुनील राऊत हा शेतकऱ्यांकडून बैल विकित घेऊन ते कत्तल करण्यासाठी पाठवणार आहे. अशी खात्रीशीर माहिती पवनानगर येथील गोरक्षकांना मिळाली.

त्यांनी प्रतीक भेगडे यांच्याशी संपर्क साधून सदर माहिती कळवली प्रतीक भेगडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली.

सदर ठिकाणी पवनानगर येथील गोरक्षक , ज्ञानेश्वर आंद्रे, विजय मांढुळे, प्रशांत ठाकर, प्रदीप मालुसरे, विश्वास दळवी, यांनी कामशेत पोलिसांच्या मदतीने लोखंडिवाडी येथे सापळा रचून सदर टेम्पो पवनानगर बाजूनी कामशेत दिशेने येताना दिसला गोरक्षक व पोलिसांच्या मदतीने टेम्पो थांबूवून पाहणी केली.

टेम्पोच्या मागील बाजूस ताडपत्री काढून पाहिले तीन देशी बैल क्रुरतेने बांधलेले दिसले त्यानां कसलीही चारा पाण्याची व्यवस्था नव्हती. सदर टेम्पो पोलिसांच्या मदतीने कामशेत पोलीस स्टेशनला नेण्यात आला. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व बैल पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे सुखरूप सोडण्यात आले. या कारवाईसाठी मानद पशुकल्याण अधिकारी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ही कारवाई  सुधिर दहिभाते, चंद्रकांत बोंबले, प्रशांत आंद्रे, दत्ता ठाकर, सुभाष भोते, सौरभ आंद्रे, सूरज तोडकर, ऋतिक येवले, प्रसाद खराडे, अनिकेत वरघडे, सनी दाहिभाते, निलेश ठाकर तसेच कामशेत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी  व पोलिस कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!