
इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात
तळेगाव दाभाडे:
इनरव्हील क्लब तळेगांव दाभाडेच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
क्लबच्या आवारात इनरव्हील क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा संध्या थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नीता काळोखे, प्रवीण साठे, भावना चव्हाण, नीलिमा बारटक्के, सचिव निशा पवार, सहसचिव रश्मी थोरात, आयएसओ वैभवी पवार, सीसी संगीता शेडे, डॉ लता पुणे, ज्योती देशपांडे, अर्चना मुरूगकर हजर होत्या.
क्लब हॉल मध्ये एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या किरण माने आणि इतर विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. तिरंगी रंगाची आकर्षण रांगोळी रेखाटण्यात आली होतक.
इनरव्हील क्लबने त. दा.ने दत्तक घेतलेल्या विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही ध्वजारोहणा वेळी अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, सहसचिव रश्मी थोरात, आयएसओ वैभवी पवार, सीसी संगीता शेडे, प्रवीण साठे, भावना चव्हाण, नीलिमा बारटक्के, ज्योती देशपांडे, अर्चना मुरुगकर उपस्थित होत्या. हॅपी स्कूल या डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत या शाळेची निवड झाली असून शाळेला वॉटर प्युरीफायर आणि लाकडी लायब्ररीचे कपाट प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा एकनाथ सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.इनरव्हील क्लब च्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
माजी प्रेसिडेंट प्रवीण साठे यांनी शिरगाव येथील ज्ञानबोधिनी इंग्लिश मिडीयम शाळेत ज्वेल्स ऑफ इंडिया ही वेशभूषा स्पर्धा आयोजित केली. यात शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा खांबेटे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी या स्पर्धेेकरिता मुलांना उत्तम मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेतली.
राजमाता जिजाऊ, सईबाई, झाशीची राणी, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मंगल पांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, कल्पना चावला, मेधा पाटकर, सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारल्या. स्पर्धेचे परीक्षण नीलिमा बारटक्के, भावना चव्हाण, अर्चना मुरुगकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना नीलिमा बारटक्के यांनी टी शर्ट्स बक्षीस दिले. तर प्रवीण साठे यांनी सर्व स्पर्धकांना पेन भेट दिले. स्पर्धा तिसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटात झाली. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे
पहिला गट – ३री ते ४थी
प्रथम क्रमांक – रिध्दी गुरव
द्वितीय क्रमांक – स्वराली भिंगोले
तृतीय क्रमांक – आरोही देठे
दुसरा गट – पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक – आर्या सोरटे
द्वितीय क्रमांक – शार्दुल देशमुख
तृतीय क्रमांक – स्वराज आंबेकर.
अध्यक्षा संध्या थोरात यांनी सर्व विजेत्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. इनरव्हील संस्था तळेगांव दाभाडे बद्दल उपस्थितांना माहिती दिली. गेली २५ वर्षे ही संस्था तळेगांव व मावळ परिसरात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्राविषयी अत्यंत समर्पित भावाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




