वडगाव मावळ:
मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त आयोजित केलेल्या श्री.विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभास शहरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे अडीच ते तीन हजाराहून अधिक महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

शहरात पहिल्यांदाच श्री.विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे हजारों जपनाम करण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सदस्य आणि भक्तगणांचे  सहकार्य लाभले कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके,नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपाली गराडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, प्रमिला बाफना, पुजावहिले, वैशाली कुडे, सुनिता ढोरे, सुप्रिया वाघमारे, प्रियंका खैरे, मोरया महिला प्रतिष्ठान उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप करण्यात आला. हळदीकुंकवाचे वाण देण्यात आले. मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, सदस्या आणि शहरातील महिला उपस्थित होत्या. मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!