कामशेत:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत ७६ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्योजक रणजित रामदास काकडे यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन, दीपप्रज्वलन करून त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, युवराज शिंदे ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.आश्रमगीताने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका देवरे यांनी केले. संजय हांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीनी एकात्मता स्तोत्रचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे रणजित काकडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. आश्रमशाळेत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अमूल्य संस्काराचे मनापासून स्वागत केले.
संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे मॅडम, प्रभारी मुख्याध्यापक श्री. तुकाराम पवार यांच्यासह शाळेतील सर्व अध्यापकांनी निपुण भारतची शपथ घेतली. महर्षी कर्वे आश्रमशाळा व विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कामशेत शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान