
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
राष्ट्र
राष्ट्र आपल्या जीवनाचे सर्वस्व असून राष्ट्रासाठी कुठलाही त्याग करण्यास जो सिद्ध असतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
राष्ट्राची अधोगती होण्यात आपली अधोगती आहे व राष्ट्राची प्रगती होण्यात आपली प्रगती आहे हे जो जाणतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
“राष्ट्रशिस्त, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रगती, राष्ट्र संरक्षण आणि राष्ट्र कर्तव्य” हे राष्ट्रीय जीवनाचे पंचशील जो पालन करतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
राष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी जो विविध क्षेत्रात प्रवेश करून ज्ञान संपादन करतो व त्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या उत्कर्षासाठी करतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
आपल्या वाट्याला आलेले समाज उपयुक्त काम जो अत्यंत आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार वगैरे अनिष्ट मार्गांनी जो सत्ता-संपत्ती-पैसा संपादन करीत नाही तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
हातात आलेली सत्ता जो स्वत:च्या स्वार्थासाठी न राबविता फक्त लोकांच्या भल्यासाठी, हितासाठी, कल्याणासाठी व राष्ट्र प्रगतीसाठी वापरतो तो या राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
धर्म, वर्ण, जात, जमात, पंथ, वंश, प्रांत अशा मानवानेच निर्माण केलेल्या मानव निर्मित संकुचित बंधनांना जो महत्व देत नाही व “आपण सर्व राष्ट्राचे नागरिक असून आपण सर्व समान आहोत” अशी ज्याची प्रामाणिक धारणा असते, तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
आपला प्रत्येक ”विचार-उच्चार-आचार” हा राष्ट्राच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, हितासाठीच असला पाहिजे, या धारणेने जो जीवन जगतो, तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय.*
या देशातील प्रत्येक विद्यार्थी राष्ट्राचा उत्तम नागरिक बनावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
“हे जग सुखी व्हावे”,
* “हे राष्ट्र आमुचे सर्वार्थांने” …*
* “पुढे पुढे जावे”*
सद्गुरू श्री वामनराव पै
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन




