आचार्य अत्रे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव: श्रीकांत चौगुले
पिंपरी:
आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ प्राप्त झाले आणि अखेर मराठी भाषकांचा महाराष्ट्र आकाराला आला!” असे प्रतिपादन लेखक श्रीकांत चौगुले यांनी केले.
संत तुकारामनगर येथील सोहम ग्रंथालयामध्ये आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चौगुले पुढे म्हणाले की, “अत्रे आणि पुलं हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. अत्रेंचे कर्तृत्व विविधांगी आहे. त्यांनी साहित्य, कला, राजकारण, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात उत्तुंग कार्य केले. त्यांचे वक्तृत्व आणि विनोदीशैली यामुळे त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसायला आणि गंभीर विषयांवर अंतर्मुख व्हायला शिकविले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र आणि मराठी माणूस कधीच विसरणार नाही!”
याप्रसंगी जगन्नाथ नेरकर म्हणाले की, “अत्रे यांचे लेखन आणि त्यांची विनोदी नाटके आजही रसिकांना भावतात. आजच्या तरुणांनी अशा संस्कृतीचा हा अनमोल ठेवा जपला पाहिजे!”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश लिपणे यांनी केले. यावेळी स्थानिक नागरिक, ग्रंथालयाचे वाचक आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष