वडगाव मावळ:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून वडगाव कातवी वासीयांसाठी मोफत २००० तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.
शनिवार दिनांक १२ ऑगस्ट ते सोमवार दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत राष्ट्रध्वज वाटप होणार आहे. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या निवासस्थान जवळील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने राष्ट्र अभिमान
आणि स्वातंत्र्य प्रति आपल्या मनातील आत्मीयता
प्रकट करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम अंतर्गत आपण सर्वानी आपल्या घरावर दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान देशाची आण बाण शान असलेला तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्र प्रति असलेला समर्पण भाव जागृत करूया तसेच मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी घरोघरी आपला ”तिरंगा” उंच फडकवूया. या अभियानात सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊया घरोघरी तिरंगा फडकावूया असे आवाहन करण्यात येत आहे.
शहरातील नागरिकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज लावून हर घर तिरंगा अभियानामध्ये उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत.
एका कुटुंबास एकच तिरंगा ध्वज मिळणार असून प्रथम येणाऱ्या व्यक्तीस पहिले प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क
८९८३८७८७२२ / ९७६५८९६५७७/ ९८२२८३८८२३ वर संपर्क साधावा.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष