फिडेल सॉफ्टेकची सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रमांना भरीव मदत – सुनील कुलकर्णी
प्रतिनिधी श्रावणी कामत
पुणे: एआय, एडीएएस आणि नवीन तंत्रज्ञानांच्या एकत्र येण्याने भाषा व तंत्रज्ञानाशी संबंधी सल्लामसलत या क्षेत्रांमध्ये एकत्रीकरण सेवा देत असताना फिडेल सॉफ्टेक कंपनीने या क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे याचा
संचालक मंडळाला अभिमान आहे.
आर्थिक विकासाचे ध्येय साध्य करीत असताना सामाजिक आणि पर्यावरणीय सुधारणेमध्ये देखील फिडेल सॉफ्टेक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भाषा तंत्रज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या फिडेल सॉफ्टेक या कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून गेले वर्षभर समाजातील विविध घटक, म्हणजेच शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या समाजोपयोगी उपक्रमांना भरीव मदत केली आहे अशी माहिती फिडेल सॉफ्टेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रमुख संचालक सुनील कुलकर्णी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
फिडेल सॉफ्टेक लि. च्या सभासदांची सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी कंपनीच्या व्यावसायिक प्रगतीची आणि कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच कंपनीची पुढील वाटचाल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन आव्हाने अशा विविध विषयांवर या प्रसंगी उहापोह करण्यात आला. यावेळी व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, प्रदीप धरणे, डॉ. गिरीश देसाई, डॉ. अपूर्वा जोशी तसेच अन्य सभासद उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, फिडेल सॉफ्टेकने गेले वर्षभर सीएसआर अॅक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून विविध शैक्षणिक, कौशल्य विकास, स्टार्टअप सहाय्यपर उपक्रमांमध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला असून इडार्च, थिंकशार्प फाउंडेशन, विद्यार्थी सहाय्यक समिती, एमआयटी इनक्युबेशन सेंटर, फॉरेस्ट या त्यापैकी काही लाभार्थी स्वयंसेवी संस्था आहेत. २०२२-२३ मध्ये कंपनी लिमिटेड झाल्यापासून महसूल आणि नफ्यात डबल डिजिटने वाढ झाली.
कंपनीच्या व्यवस्थापन संघाने कंपनीची महसुली वाढ, नफा आणि प्रमुख आर्थिक निर्देशकांवर तपशीलवार अहवाल सादर केला. सभासदांनी खरेदी केलेल्या प्रत्येक शेअर्ससाठी त्यांना निर्धारित लाभांश देण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी जाहीर केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठळक मुद्दे :
एआय, एडीएएस आणि नवीन तंत्रज्ञानांच्या एकत्र येण्याने भाषा व तंत्रज्ञानाशी संबंधी सल्लामसलत या क्षेत्रांचे एकत्रीकरण.
फिडेलने या क्षेत्रामध्ये निर्माण केलेली स्वतःची वेगळी ओळख.
कंपनीच्या जपानशी असलेल्या व्यवसायाभिमुख संबंधांमधील वृद्धी.
भाषा, तंत्रज्ञान आणि संवाद (कम्युनिकेशन) हे घटक या वरील सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असल्याने बाजारातील त्यांची वाढती उपलब्धता.
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार