ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी ॲड. निवृत्ती फलके
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची तळेगाव स्टेशन विभागाच्या काँग्रेस आय पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले.
तळेगाव स्टेशन येथे काँग्रेस आय पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सदर नियुक्ती बाबतची घोषणा तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केली आहे.
ॲड निवृत्ती फलके पश्चिम महाराष्ट्र वारकरी समुदायाचे अध्यक्ष असून, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.
प्रदीर्घ राजकीय संघटनात्मक बांधणीचा ॲड. निवृत्ती फलके यांना अनुभव असून तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदाच होणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास आप्पा काकडे यांनी व्यक्त केले आहे.
बेरोजगारी भ्रष्टाचार व महागाई मणिपूर तसेच पंजाब व हरियाणा येथे होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या सर्व घटनांमुळे केंद्र शासनाच्या सरकार वरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हळूहळू उडत चालला असून, ऐतिहासिक अशा स्थिर काँग्रेस पक्षाला भविष्यामध्ये देशाला व राज्याला पुढे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्यामुळे काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तालुक्यात प्रयत्न करणार असल्याचे ॲड .निवृत्ती फलके यांनी नमूद केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, जिल्ह्याचे नेते रामदास आप्पा काकडे, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले ,तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ ,तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी मार्गदर्शन केले.
ॲड निवृत्ती फलके यांच्या निवडी बाबत सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, जिल्ह्याचे वरिष्ठ नेते रामदास काकडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रदेश सदस्य ॲड .दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तीकोने, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, तळेगाव स्टेशन कार्याध्यक्ष योगेश पारगे, तळेगाव स्टेशन युवक अध्यक्ष समीर दाभाडे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळूंज ,तळेगाव युवक कार्याध्यक्ष राम शहाणे उपस्थित होते.
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार