वडगाव मावळ:
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक ही उपाधी जनतेने दिली. अशा महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी मनोहर भिडे यांनी बेताल वक्तव्य केले ह्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मावळ तालुक्याच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंदोलनकर्त्यांनी केली. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून भिडे यांच्या कडून महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य वाढत चालली आहेत. हे लवकर थांबवावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विकि लोखंडे यांनी दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा दीपाली गराडे, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा ज्योती आंबेकर, कार्याध्यक्षा मनिषा रघुवंशी, तळेगाव शहर अध्यक्षा शैलेजा काळोखे, ज्योती शिंदे, जयश्री गोठे, मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सागर भालेराव,कार्याध्यक्ष तेजस बनसोडे, महेश रघुवंशी, भाऊ ढोरे,वडगांव अध्यक्ष गणेश पाटोळे, सागर पाटोळे, किरण ओव्हाळ अजय भालेराव, आशिष भालेराव उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष विकी लोखंडे म्हणाले,”महापुरुषांची बदनामी करणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोरुग्ण अश्या प्रवृत्ती वर जर कायदेशीर कठोर कारवाही झाली नाही तर रस्त्यावर उतरून पुणे जिल्हा भर मोठं आंदोलन उभारू व जाहीर निषेध करु.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!