तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मातोश्री तिलोत्तमा वसंतराव खांडगे उद्यानाचा पाचवा वर्धापनदिन व विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

अंबरचे संपादक  सुरेश साखवळकर , नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार(सहसचिव नू.म.वि.प्र),संचालक सोनबा गोपाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अविनाश पाटील,सुहास गरूड,संदिप पानसरे उपस्थित होते.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व  ज्येष्ठ सल्लागार वसंतराव (दादा) यांच्या ८८ व्या वाढदिवसाचे
निमित्त साधून वर्धापनदिनाचा कार्यक्रम करण्यात आला.गोपाळे गुरुजी यानी प्रास्ताविक केले. सर्व
मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन व वृक्षारोपण करण्यात आले.इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती विषयक सुंदर पथनाट्य सादर केले.’माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत’ जिंगल बनविणे स्पर्धेत आयुषी अमेय राऊत हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

  सुरेश साखवळकर म्हणाले,” शाळेने जपलेला पर्यावरणाचा वसा असाच वृद्धिंगत करावा. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’प्रकल्पांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी शाळेच्या सर्व हाऊस चे कॅप्टन व वाइस कॅप्टन यांनी आपल्या पदाची शपथ घेऊन कार्यभाराची जबाबदारी स्वीकारली.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनरश्मी दुबे यांनी केले. पूजा कोटस्थाने यांनी आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन, व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!