पुणे:
टेलस ऑर्गानायझेशनच्या वतीने कोथरूड येथील छत्रपती संभाजी विद्यालयाच्या इयत्ता सहावी व सातवीच्या ७५  विद्यार्थ्यांना प्लास्टिक बाटल्यांना योग्य पर्याय म्हणून स्टीलच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

प्लास्टिकच्या अतिवापराचे सर्व सजीव सृष्टी वर  होणारे दुष्परिणाम ,प्लास्टिकला असलेले ठोस पर्यायांचा वापर व वापरल्या गेलेल्या प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे या बाबत लोकेश बापट यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

संस्थेचे राजन कुबेर यांनी मौनव्रत याचे  महत्व, त्याची ताकद,  यातून आपल्याला घडवणारे  विचार याची माहिती दिली.

error: Content is protected !!