तळेगाव दाभाडे :
वन्यजीव मावळ रक्षक संस्था नेहमीच वन्यजीवांच्या रक्षणासाठी पुढाकार घेत असल्याचे आपण पाहतो. अशाच वन्यजीव मावळ रक्षक संस्थेच्या कार्यकर्त्याच्या प्राणिमात्रांच्या भूतदयेचा पुन्हा एकदा अनुभव आला. वन्यजीव संस्थेने ४३ बगळयांना जीवदान देण्यात आले.
तळेगांव दाभाडे नगरपरिषद उद्यानविभागाचे प्रमुख सिध्देश्वर महाजन यांनी मोबाईल वरून माहिती दिली की,जिजामाता चौका जवळ जितेंद्र कदम यांच्या घरावर एक बाबळीचे झाड पडले आहे त्या झाडावर बरेच पक्ष्यांची घरटी आहेत व ते झाड पडलेले आहे व डोळसनाथ कॅालनीची संपूर्ण लाईट गेलेली आहे.
त्या झाडावर बरेच पक्ष्यांची पिल्ले आहे तसा फोन त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन केला काही वेळातच संस्थेचे सदस्य जिगर सोळंकी तिथे पोचले व त्यांनी पाहीले की ही बगळे आहे व यांचे आधिवस झाड पडल्याने त्यांचे घर झाले नष्ट आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती दिली व लगेच संस्थेचे सहकारी किरण मोकाशी, श्रेयस कांबळे, प्रियांका शर्मा, जिगर सोलंकी, विकी दौंडकर, गणेश निसाळ, गणेश ढोरे , भास्कर माळी, अनिश गराडे त्या ठिकाणी पोहचले.
बेघर झालेल्या बगळ्यांच्या पिल्लांना एक एक करुनपकडून बास्केट मध्ये ठेऊ लागले.एक एक करत ४३ पिल्ले भेटली. तर तीन पिल्ले मृत पावली होती. सर्व पिल्ले ही पुणे वन विभाग पुणे ACF आशुतोष शेंडगे व वडगांव मावळे चे रेंज ॲाफीसर हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणें येथील रेस्कु चारीटेबल ट्रस्ट यांना बोलावून पुढील उपचारा साठी रेस्कु सेंटर ला पाठवण्यात आले आहे.
वनपाल एन. के.हिरेमठ,वनरक्षक योगेश कोकाटे,वनसेवक किसन गावडे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थे सदस्य उपस्थित राहून सगळे पक्षी सुखरूप रेसॅकु टीम यांच्या ताब्यात देऊन पुढील उपचारा साठी रेसॅकु सेंटर भुगांव येथे पाठवण्यात आले .
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळ च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले.