नेवासे येथे उभारणार देशातील पहिला पसायदान स्तंभ
वडगाव मावळ:
श्री क्षेत्र आळंदी येथील गो दान पसायदान विश्वजागृती. धर्मादाय संस्था श्री. मारुती देवस्थान, गोपाळपुरा यांच्या सर्व समाजाला प्रेरणादायी आणि संस्कृती जतनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले पसायदान विश्व दीपस्तंभ कृती समितीच्या अध्यक्षपदी वडगांव मावळ येथील भास्करराव म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पसायदान गोदान विश्र्वजागृती धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष मुबारक भाई शेख , सचिव भाऊसाहेब घोडके, खजिनदार रामदास रानवडे, सह खजिनदार विनायक मोकाशी, मार्गदर्शक श्रीमंत ज्ञानेश्वर मोरे , रामदास जैद, विठ्ठलराव घारे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरुडे, सदस्य महेश राऊत , प्रशांत दरेकर, शिवाजी पाटील , ॲड. निवृत्ती फलके , सुदेश गिरमे , नगरसेवक श्रीधर चव्हाण, दत्तात्रय साबळे , नवनाथ शिंदे , सुनील ढोबळे ,भाऊसाहेब लिंबोरे , राजू पटेल, अनिल पाटील , उमाजी बिसेन व अन्य सदस्य उपस्थित होते.
पसायदान गोदान विश्र्वजागृती धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष मुबारक शेख यांनी प्रास्ताविक केले आणि या उपक्रमाची संकल्पना विशद केली. रामदास जैद यांनी आपल्या मनोगतात या विश्वव्यापक तसेच समाजाला प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रकल्पाचे महत्त्व सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी सांगितले की जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली त्या महाराष्ट्रातील नेवासे या ठिकाणी सर्वांच्या सोबतीने देशातील पहिला पसायदान दिप स्तंभ उभारण्याचा मानस असुन या दिपस्तंभाच्या आजुबाजुला गार्डन , वाचनालय असे भव्यदिव्य दिपस्तंभाची उभारणी करण्यात येणार असुन महाराष्ट्रात मराठी भाषेसह भारतातील विविध राज्यांमध्ये स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये देखील पसायदान विश्वदिप स्तंभ उभारण्यात येणार आहे.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन