“संतांचा महिमा संत झाल्याशिवाय कळत नाही.

लोकांना बिकट परिस्थितीतून बाहेर काडून व त्यांना अचूक मार्गदर्शन करून ”स्वास्थ्य व सुख” यांच्या राजमार्गावर आणणे हे संतांचे अलौकिक कार्य होय.
परंतु , …..

संत व सद्गुरू यांत फार फरक आहे.
प्रत्येक आई ही बाई असते परंतु प्रत्येक बाई ही आई असते असे नाही. त्याप्रमाणे …. सद्गुरू हे संत असतात परंतु प्रत्येक संत हे सद्गुरू असतात असे नाही.

एखादा संत, संत म्हणून कितीही थोर असला किंवा लोकांत त्याचे फार मोठे नांव झालेले असले तरी साधकांना आत्मलाभाचे परमभाग्य देण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असेलच असे नाही.
किंबहुना, …..
असे सामर्थ्य अनेक सतांकडे नसतेच. म्हणूनच अशा थोर संतांच्या मागे धावणाऱ्या अनेक उत्तम व उत्कृष्ट अशा साधकांच् पदरी शेवटी घोर निराशा पडते.

संत आपल्या परी किती थोर आहे यापेक्षां साधकांचा उद्धार करण्याचे किंवा आत्मलाभ देण्याचे सामर्थ्य व तळमळ त्याच्या ठिकाणी आहे का? यालाच जास्त महत्त्व आहे.

वास्तविक,
‘सद्गुरु महिमा अगाध” ही अतिशयोक्ति नसून वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच सर्व संतांनी सद्गुरूंचा महिमा मुक्तकंठाने गायलेला आहे. कारण …
सद्गुरूंनी अपरंपार कष्ट, परिश्रम, अभ्यास व तपश्चर्या करून दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतलेला असतो.

🪷 सद्गुरुचा महिमा सर्व संतांनी मुक्त कंठाने वर्णन केला आहे.

ज्ञानेश्वरीत तर प्रत्येक अध्यायात ज्ञानेश्वर माऊलीनी सद्गुरुची महती, महिमा व स्तुती तोंड भरून केली आहे. याचे कारण उघड आहे. अध्यात्म विद्या ही सर्व विद्यांचा राजा आहे, सर्व गुह्यांचा राजा आहे, अपार सुख देणारी आहे, अत्यंत पवित्र आहे, अतिशय उत्तम आहे, केवळ काल्पनिक नसून प्रत्यक्ष अनुभवता येणारी आहे वगैरे उत्कृष्ट वर्णन गीतेत व हरिपाठांत केले आहे.

१) राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्।।
(९ : २: भ.गी.)
२) इति गुह्यतमं शास्त्रं इदमुक्तं मयानध।
एतद्द्बुद्ध्वा भारत बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च।।
(१५ : २० : भ.गी.)
३) ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले।
निवृत्तीने दिधले माझे हाती।।

अशी राजविद्या जी अत्यंत गुह्य आहे ती शिकविणाऱ्या सद्गुरुंची संतांनी त्यांच्या सिद्ध हस्त शैलीने मुक्त कंठाने स्तुती न केली तरच नवल. *-- सद्गुरू श्री वामनराव पै*

error: Content is protected !!