वडगाव मावळ:
मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव नगरपंचायत कर्मचारी बांधवांना रेनकोट व बूट चे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून “मदत नव्हे कर्तव्य” या सामाजिक बांधिलकीतून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी बांधवांना रेनकोट व बूट भेट देण्यात आले.

वडगाव शहरातील नागरिकांना सदैव तत्परतेने सेवा पुरविणारे आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी बांधव खूप मोलाची भूमिका बजावत असतात.

पावसाळ्याचे दिवस असल्याने रेनकोट व बूट वाटप करण्यात आल्याने कर्मचारी बांधवानी समाधान व्यक्त करत आभार मानले.

error: Content is protected !!