सोमाटणे:
शिरगांव पोलीस स्टेशन हद्दीतील धामणे येथे पवना नदी वर पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला होता.
या कॅम्पमध्ये वन्यजीवन रक्षक मावळ संस्था ,राणी ॲम्बुलन्स ,बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आलेला आहे, एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना व काव्या करीयर अॅकादमी यांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आलेला आहे.
त्या प्रसंगी शिरगाव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ मॅडम यांच्यासोबत व इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ , उपाध्यक्ष गणेश ढोरे ,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, सत्यम सावंत,शुभम काकडे,कुनाल दाभाडे ,ओमकार भेगडे ,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,कमल परदेशी या डेमो कॅंप करण्याची शिरगाव पोलीस यांनी संस्थेला जी संधी दिले त्या बद्दल रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी आभार मानले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन