माणसाचे नशीब व त्याचे पाप-पुण्य यांचा परस्पर संबंध?
बहुसंख्य लोकांची वरील धारणा संपूर्ण चुकीची आहे.“नशीब आधीच ठरलेले आहे,माणसाच्या हातात काहीही नाही,कपाळावर सटवीने जन्मानंतर पाचव्या दिवशी जे काही लिहून ठेवलेले आहे त्याचप्रमाणे सर्व काही घडणार”,अशा आचरट समजुतीच्या आहारी जाऊन बहुसंख्य लोक स्वत:चा सर्वनाश ओढवून घेण्यास कारणीभूत ठरतात.
वास्तविक वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट आहे.जीवन विद्येचा खालील सिद्धांत या संदर्भात मौल्यवान आहे.“ नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हेच खरे.पुढे काय घडणार हे सर्व जन्मल्यानंतर पांचव्या दिवशी सटवीने आधीच आपल्या कपाळावर लिहून ठेवलेले आहे,ही समजूत मुळातच पूर्णपणे चुकीची आहे.
दुसऱ्या शब्दात हेच सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की,माणूसच आपल्या कपाळावर लिहिण्याचे कार्य स्वत:आपल्या कर्मांनीच करत असतो.
खरे सांगावयाचे झाले तर पुढे काय घडणार हे शंभर टक्के जरी नाही तरी नव्वद टक्के माणूसच ठरवित असतो अन्य कोणीही नाही.’आज’ जी पुण्यकर्मे किंवा पापकर्मे माणूस करतो त्यानुसार त्याचे ‘उद्याचे’ भवितव्य ठरणार असते,कारण उद्याचे भवितव्य हे आजच्या कर्मांचे फळ (Reaction) असते.
म्हणून चुकून किंवा मोहाला बळी पडून किंवा अन्य काही कारणामुळे जर माणसाचे पाऊल वाकडे पडलेच तर निसर्गाने माणसाला जे कर्म स्वातंत्र्य बहाल केलेले आहे व सारासार विचार करण्यासाठी जी बुद्धी दिलेली आहे त्यांचा उपयोग करून त्या वाकड्या मार्गाने पुढे पुढे फरफटत न जाता त्यापासून तात्काळ परावृत्त होऊन परत सरळ मार्गावर येणे आवश्यक असते.
या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत लक्षात ठेवणे इष्ट ठरेल.
“वस्तुस्थितीचा स्वीकार करुन तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.”
सद्गुरू श्री वामनराव पै.
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार