माजी विद्यार्थी विकास गायकवाड यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा
कामशेत:
नाणे माध्यमिक विद्यालय,नाणे ता.मावळ येथील माजी विद्यार्थी विकास नामदेव गायकवाड याने आपला स्वतःचा वाढदिवस पुर्वाश्रमीच्या आपल्या शाळेत येऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला. व सामाजिक बांधिलकी व शाळेप्रति असणारे कृतज्ञतेची भावना त्याने व्यक्त केली.

       समाजामध्ये वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला जाणारा खर्च हे एक वेगळं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसून येते परंतु वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून शाळेमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने आपला वाढदिवसाचा आनंद देऊनीत करण्याचा प्रयत्न कांब्रे येथील तरुण उद्योजक विकास नामदेव गायकवाड यांनी केला.

. प्रसंगी वाढदिवसाच्या निमित्ताने विकास गायकवाड यांनी विद्यालयास मुलांना जेवणासाठीची वीस ताटे एक फॅन व सुमारे १०० गुलाबाचे रोपे दिली तसेच विद्यार्थ्यांना या निमित्ताने खाऊ वाटपही करण्यात आले.

विकास यांनी समाजाप्रती आणि शालेय प्रति असणारे आपले सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला शाळेतील गुरुजन वर्गांचे आपल्या वरती ऋण आहेत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तसेच शाळे प्रतीचे आपले आपुलकी जतन करण्यासाठी मी वाढदिवस शाळेमध्ये साजरा करण्याचे ठरवले. असे त्यावेळी विकास यांनी भावना व्यक्त केल्या.

त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षक पावरा  शुभेच्छा देत असताना विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठा व्हावं आपल्या कुटुंबाचे, घराण्याचे, गावाचे, तालुक्याचे नाव मोठं करावं व आपल्याला मदत करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञतेची भावना जतन करावी असे विचार व्यक्त केले.
      
माजी विद्यार्थी निलेश कटके, अतिश गरवड,दिनेश शिंदे, अजय नाणेकर व कडधे येथील विकास गायकवाड उपस्थित होते. प्रसंगी सदर कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक स्वप्निल नागणे,ज्येष्ठ शिक्षक पोपट पारसे  यांनी विकास यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सहशिक्षक सोमनाथ गोडसे यांनी मानले.

error: Content is protected !!