कर्जत:
रायगड जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात असलेल्या – इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली.या दुर्घटनेत संपूर्ण गाव मलब्याखाली दबले गेले आहे.

रात्री घटलेल्या या घटनेत जागे असणारे चार पाच तरुण यांचा जीव वाचला असून त्यांनी या घटनेची माहिती पायथ्याशी असणाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्रीपासूनच घटनास्थळी बचाव दल, पोलिस, मंत्री आदी यंत्रणा दाखल होत मदत कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईरशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही वस्ती वजा गाव  ३५ ते ४० घरांचे गाव आहे. या गावावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळली ज्यात चार पाच घरे वगळता बाकी सर्व घरांवर दरड कोसळून ती मलब्याखाली दबली गेली आहेत. साधारण १०० हून अधिक जण या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

आतापर्यंत वाचवल्यापैकी ४ जण दगावले असून त्यात एका अग्नीशमन दलाच्या जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.अशी दुर्घटना यापूर्वी माळीण गावात घडली होती,या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अशा धोकादायक गावांचे सर्वेक्षण करून त्यांचे स्थलांतर करणे आवश्यक होते मात्र तसे होताना दिसत नसलेल्या चर्चा या निमित्त पुन्हा होऊ लागल्या आहे.

मावळ तालुक्यातील देखील अशा धोकादायक गावांचे सर्वेक्षण झाले मात्र या गावातील नागरिकांना शासनाने काहीच मदत केली नाही. पुनर्वसनाचे कागद लालफितीत सालोसाल तसेच पडून आहे.

मावळ तालुक्यातील तुंग किल्ल्याच्या शेजारच्या तुंगी गावाच्या बाजुचा  कड्याचा काही भाग सुटलेला आहे ,हा परिसर धोकादायक असल्याची बाब शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने निदर्शनास आणून दिला आहे. मावळ तालुक्याचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या घटनेकडे गांभिर्याने पाहून योग्य तो निर्णय घेतली असा विश्वास आहे.

error: Content is protected !!